राजुरा येथे ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाने 8 व्या वर्गातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला केला गर्भवती.
★ शिक्षकाला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक.
एस.के.24 तास
राजुरा : आठव्या वर्गातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.17) तालुक्यात उघडकीस आली.ती एका खाजगी शिकवणीला जात होती. तिला जाळ्यात ओढून शिक्षकाने तिला गर्भवती केले.राजुरा पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
गणेश मोरे वय,23 वर्ष असे आरोपीचे नाव आहे.
कौटुंबिक संबंध असल्याने पालकाने खाजगी क्लासेस चालविणारा आरोपी शिक्षक गणेश मोरे यांच्याकडे मुलीला शिकविण्यासाठी पाठविले. त्याने या मुलीला जाळ्यात ओढले.आणि तिच्यावर अत्याचार केला. ती गर्भवती झाली.
प्रकृतीबाबत तिला कोणताही त्रास होत नसल्याने, सुरुवातीच्या दिवसात कोणाच्याही लक्षात आले नाही.जेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले तेव्हा वेळ निघून गेली होती.दोन दिवसापूर्वी पोटात दुखत असल्याने मुलीने आईला सांगितले. आईने मुलीला राजुरा येथील खाजगी रुग्णालयात डॉक्टरांना दाखविले.
त्यांनी चंद्रपूर येथे जाण्याचा सल्ला दिला. आई-वडिलांनी मुलीला चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले.तेव्हा ती गर्भवती असल्याची लक्षात आले. तिने त्याच रुग्णालयात बाळाला जन्म दिला पालकांच्या तक्रारीवरून राजूरा पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३७६(३),३७६(२) व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.