राजुरा आगारातील बस चालते फक्त कागदावरच प्रत्यक्षात बसच नाही
★ राजुरा आगार प्रमुखाच्या नियोजनाअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय ; तहसीलदारांच्या आदेशाने रात्रौ 7 वाजता लागली बस.
एस.के.24 तास
राजुरा : राजुरा बस स्थानक नेहमीच कोणत्या ना कोणत्या गलथान कारभारामुळे चर्चेत असतो अशातच आज सुद्धा तुलाना येथील विद्यार्थी बस स्टँड वर शाळा सुटल्यापासून 5 वाजता पासून 7 वाजेपर्यंत अंधारात थंडीने ताटकळत बसले होते परंतु बस मात्र लावण्यात आली नाही परंतु 7 वाजता चौकशी मध्ये विचारले असता बस गेल्याचे सांगितले होते विद्यार्थी भयबित होऊन बस गेलीच नाही पण बस गेल्याचे सांगण्यात येत असलेल्याने बस स्थानका पासून जवळच असलेल्या तहसील कार्यालयात गेले.
व झालेले प्रकरण तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांना सांगितले असता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय कर्तव्यदक्ष अधिकारी ओमप्रकाश गौंड तहसीलदार राजुरा यांनी क्षणाचाही विलंब न करता एस टी च्या वरिष्ठ अधिाऱ्यांशी बोलून त्वरित बस ची व्यवस्था करून दिली व यामधे चौकशी अधिकारी यांनी बस तुलाना येथे गेल्याचे सांगण्यात आले होते.
परंतु प्रत्यक्षात मात्र बस गेलीच नाही, सदर प्रकार हा गंभीर असून कागदोपत्री गेलेली बस प्रत्यक्षात मात्र का गेली नाही म्हणून सदर प्रकरणात दोषीवर कार्यवाही ची मागणी पालकांनी केली आहे, तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांनी एस टी च्या अधिकाऱ्यांना संबंधित कागदपत्रे दाखविण्याचे सांगितले.