तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात या भूकंपाचा केंद्रबिंदू ; स्थानिक गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात सर्वदूर जाणवले 5.3 तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के. ★ इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. - जिल्हाधिकारी,संजय दैने

तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात या भूकंपाचा केंद्रबिंदू


★ स्थानिक गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात सर्वदूर जाणवले 5.3 तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के.


★ इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. -  जिल्हाधिकारी,संजय दैने 


सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!


गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर आज दिनांक,4/12/2024 बुधवार ला सकाळी 7:36. वा.च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के गडचिरोलीत जाणवले.तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याने जिल्ह्याच्या दक्षिण भागात या धक्क्यांची तीव्रता थोडी जास्त होती.मात्र कुठेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप नाही. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.3 एवढी नोंदविल्या गेली.



पुन्हा अशा प्रकारचे धक्के (कंपनं) जाणवण्याची शक्यता असून नागरिकांनी घाबरून न जाताना सतर्क राहावे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी. इमारतीबाहेर मोकळ्या जागेत सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

तेलंगणातील ज्या मुलुगू येथे या भूकंपाचे केंद्र होते ते ठिकाण सिरोंचा पासून सर्वाधिक जवळ, म्हणजे जवळपास 70 ते 80 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र सिरोंचाच नाही तर कोरचीपर्यंत या भूकंपाची कंपनं जाणवली.

दिनांक,4/12/2024 बुधवार ला गांधी वॉर्ड मध्ये  सकाळी मी अंघोळ करून घरी खुर्ची वर बसून होतो.तेवढ्यात 7.36 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्का बसला. खुर्ची साईडला सरकली व पलंग हळूच हलला आणि साईडला भांडे पण पडले. - संतोष विरवार,गांधी वॉर्ड 

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !