गडचिरोली जिल्ह्यातील 5 तालुक्यात राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (RGSA) अंतर्गत पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
पंचायत राज प्रशिक्षण केंद्र,मुल व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (RGSA) अंतर्गत पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
ग्रामसभा कोष सदस्य प्रशिक्षण कुरखेडा, कोरची,धानोरा,गडचिरोली,चामोर्शी,येथे संपन्न.पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुल, जिल्हा परिषद गडचिरोली व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2024 पर्यंत या तालुक्यात घेण्यात आले.
सदर प्रशिक्षणात पेसा कायदा 1996 व वनहक्क कायदा 2006 याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्या साठी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्राध्यापक गरपल्लीवार सर, व्याख्याते वराडकर सर,पेसा जिल्हा प्रशिक्षण समन्वयक श्री.वाकडे सर,राजू धारने सर,रवी नैताम सर,चंद्रभान चलाख सर,विनायकजी कुनघाडकर,निशा गेडाम,अर्चना जनगणवार,विनायक पाकमोडे,सुषमा चिचुळकर इत्यादी नी प्रशिक्षण दिले.