गडचिरोली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी,अविशांत पांडा
★ 26 डिसेंबर गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार.
एस.के.24 तास
गडचिरोली : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 12 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून नागपूरच्या वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त अविशांत पांडा यांची मंगळवारी 24 डिसेंबर नियुक्ती करण्यात आली.
गडचिरोलीचे विद्यमान जिल्हाधिकारी संजय दैने यांची वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.दैने यांनी मार्च ते डिसेबर 2024 असे नऊ महिने जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. नवे जिल्हाधिकारी अविशांत पांडा हे ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथील मूळ रहिवासी असून त्यांनी अभियांत्रिकी विषयात पदवी संपादन केली आहे.
2017 च्या बॅच चे आयएएस अधिकारी असलेले पांडा यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात नंदुरबारचे उपविभागीय अधिकारी म्हणून झाली.त्यानंतर त्यांनी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुढे वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली.
गुरुवारी 26 डिसेंबर ते गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.