बस मधील 2 जण जागीच ठार.तर 6 जखमी.

बस मधील 2 जण जागीच ठार.तर 6 जखमी.


एस.के.24 तास


पंढरपूर : मावळ येथील भाविक बस ने पंढरपूर कडे येत असताना समोरून मालवाहतूक करणारा ट्रक सोमर आला.आणि दोन्ही गाड्यांची समोरासमोर जोरात धडक झाली.यात बस मधील 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.तर इतर 6 जन जखमी झाले आहेत.चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

पंढरपूर शहरापासून जवळ असलेल्या भटुंबरे गावत रविवारी सकाळी 6:30 च्या सुमारास भीषण अपघात झाला.मावळ येथील काही भाविक दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले होते. पंढरपूर टेंभुर्णी रस्त्यावरील आणि शहरच्या जवळ हा अपघात झाला. 

भाविकांची बस क्र.MH.14 LS 3955  चा पंढरपूर च्या दिशेने जात होती. या बसने एका गाडीला ओव्हरटेक करत असताना समोरून मालवाहतूक ट्रक (क्रमांक.RJ 14 GL 1780 आली. मात्र बस चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे ट्रक आणि लक्झरी बस समोरासमोर जोरात धडक झाली. यात दोन्ही गाड्यांचा पुढचा भाग चक्काचूर झाल्याचे दिसून आले.

यात बस मधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 भाविक जखमी झाले. या परिसरातील नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून पोलिसाना माहिती दिली.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हालविण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने अपघाताच्या ठिकाणी पोहचले. 

या बाबत चौकशी सुरु असल्याचे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वय.मुजावर यांनी माहिती दिली.दोन्ही वाहनांचा अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.पहाटेच्या वेळी वाहन चालकाने सावधगिरीने वाहने चालवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !