151 बुद्ध मुर्तीचे बुद्ध विहाराला दान कन्हान येथे 15 डिसेंबर ला.
★ इंडो एशियन मेत्ता फाऊंडेशन इंडिआचा ऐतिहासिक उपक्रम.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
नागपुर : थायलंड श्रीलंका व वियेतनाम येथील भिक्षु संस्थांद्वारे प्राप्त 151 भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे भारतातील बौद्ध विहारांना दान आणि 28 भव्य बुद्ध मुर्तीच्या भुमीपुजनाचा भव्य समारंभ इंडो एशियन मेत्ता फाऊडेशन इंडिआ शाखा नागपुर चे वतीने रविवार दि.15 डिसेंबर 2024 ला दुपारी 11:00 वाजता बुद्धा स्पिरिच्युअल सिहोरा,कन्हान येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
जि.प सदस्य कृपाल तुमाने , आमदार बाळाभाऊ मांगुळवार , माजी मंत्री राजेंद्र मुळक , माजी आमदार मिलिंद माने , माजी आमदार मल्लीका अर्जुन रेड्डी , शिक्षण महर्षी सुरेशजी गायकवाड तर स्वागताध्यक्ष गज्जु यादव हे असुन स्वागताध्यक्ष नितिन गजभिये इंडो एशियन मेत्ता फाऊंडेशन इंडिआ हे असुन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन दिनेश शेंन्डे,स्मिता वाकडे,गोपाल रायपुरे,प्रा.मुनिश्वर बोरकर आदिनी केलेले आहे.