राजूरा ते गोविंदपुर या राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस व दुचाकी च्या अपघातात दुचाकी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू ; 12 प्रवासी किरकोळ जखमी.


राजूरा ते गोविंदपुर या राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस व दुचाकी च्या अपघातात दुचाकी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू ; 12 प्रवासी किरकोळ जखमी.


एस.के.24 तास


राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा ते गोविंदपुर या राष्ट्रीय महामार्गावर आज दि.18 डिसेंबर रोजी दुपारी 12:00 वाजे दरम्यान,राज्य परिवहन महामंडळाची बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, बस चालकासह बस मधील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.


आज बुधवारी सकाळी किनवट आगाराची बस क्रं.MH.14 BT.1941 चंद्रपूर कडून कोरपना गडचांदूर मार्गावरून जात असताना, बस समोर अचानक दुचाकी आल्याने बस चालकाने दुचाकी स्वाराला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता, बसचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीला धडक देत बस डिव्हायडर वरून रस्त्याच्या खाली उतरली. 


या अपघातात दुचाकी चालक गडचांदूर निवासी कानोजी दमाले वय,55 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला.


बस मधील 12 प्रवासी किरकोळ जखमी झाली असून, बस चालक सुधाकर सलाम वय,46 वर्ष रा.घाटंजी यवतमाळ यांना अपघातात गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर गडचांदूर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच, गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवासी व बस चालकाला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !