अमृत आहार अंगणवाडी स्वयंपाकी तालुका व जिल्हा महिला संघटना वतिने मानधन 10 हजार रुपये करण्यात यावे.
★ जिल्हा परिषद गडचिरोली येथे 70 महिलासह कृष्णा चौधरी संघटन प्रमुख यांच्या नेतृत्वात निवेदन दिले.
सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक
गडचिरोली : डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतील गरोदर माता यांचे स्वयंपाक 30 डिसेंबर 2015 पासून अमलात आली.त्यानंतर सन 2016 पासून स्वयंपाकीन महिलांची निवड करण्यात आली.तेव्हापासून सर्व महिला स्वयंपाक करीत आहेत 1000 हजार रुपये मानधनात कौटुंबिक खर्च भागत नाही.
महागाईमुळे सदरचे मानधन अपुरे पडत आहे. समाजसेवा समजून महिला काम करीत आहेत. दिवसेंदिवस अल्प मानधनावर काम करण्यास अडचण निर्माण होत आहे.प्रति महिना फक्त 1000 हजार रुपये मानधन म्हणजे केवळ 33 रुपये प्रति दिवस रोजी पडत आहे.
स्वयंपाकाचे काम प्रत्येक दिवशी भात,भाजी,वरण पोळी,अंडे,शेंगदाण्याचे लाडू करिता 5 ते 6 तास वेळ लागतात.तेव्हा विशेष बाब म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात सर्व तालुक्यातील पेसा क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतील गरोदर माता व स्तनदा मातांना स्वयंपाक शिजविनाऱ्या तालुके जिल्ह्यातील महिलांचे 10 हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावे.
मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळ मोर्चे काढून निवेदन देण्यात आले.शासन व प्रशासन यांचे लक्ष वेधण्याकरिता जिल्हा परिषद जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा या संदर्भात निवेदने देऊन आंदोलने व मोर्चे काढण्यात आले होते.
मात्र शासन व प्रशासन याकडे सर्वच दुर्लक्ष करीत आहे प्रत्यक्ष मुलाखतीतून विचारणा करून मानधनात वाढ करण्याबाबत आश्वासन देण्यात येतात पण अजून पर्यंत कुठल्याच ठोस उपाययोजना करून याबाबतचे शासनाकडून जीआर काढण्यात आलेले नाही.
या विषयावर गंभीरपणे तपासणी करून महिलांना मानधनात वाढ करण्यात यावी असे संपूर्ण जिल्ह्यात जवळपास सहा ते सात हजार अमृता आहार स्वयंपाकीन महिला आहेत निरंतर मानधन वाढीचे मागणी करून सुद्धा मानधनात वाढ नसल्यामुळे मागील नऊ वर्षापासून महिलांना वेठबिगारीचे काम करून घेतल्या जात आहे.
त्यामुळे महिलांना मानसिक शारीरिक आर्थिक याचे शोषण केले जात आहे यामध्ये शासन प्रशासन तात्काळ निर्णय घेऊन आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावा अन्यथा आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत वारंवार आंदोलने व मोर्चे काढत राहो याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावे प्रमुख मानधनात वाढ करणे कामाचे तास कमी करण्यात यावे अशी मागणी महिला केले.