प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथे X-Ray शिबिर संपन्न ; अतिदुर्गम भागातील 144 रुग्णांनी घेतला लाभ.
एस.के.24 तास
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथे जिल्हा स्तरावरून तज्ञ डॉक्टर च्या उपस्थितीत X-Ray शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिर ग्रामीण भागातील अतिदुर्ग क्षेत्रातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले संपूर्ण जिवती तालुक्यात X-Ray मशीन उपलब्ध नसल्याने अनेक गरीब रुग्ण रोगाचे निदान न झाल्यामुळे योग्य औषध उपचार घेऊ शकत नव्हते असे कॅम्प ग्रामीण भागात नेहमी नेहमी होत राहावे अशी प्रतिक्रिया जनसामान्यांन कडून बोलले जात आहे.
सदर कॅम्प जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे जिल्हा परिषद चंद्रपूर, मा.ललित कुमार पटले सर जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. स्वप्नील टेंभे तालुका आरोग्य अधिकारी जिवती
यांच्या मार्गदर्शनाथ प्राथमिक आरोग्य केंद्रे शेनगाव येथे घेण्यात आला . कॅम्प मध्ये संशयीत क्षयरुग्णांचे ११४ लोकांचे chest X-ray काढण्यात आले , प्राथमिक आरोग्य केंद्र शेनगाव येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ करेवाड यांच्या हस्ते शिबिराचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले कॅम्प च्या यशस्वीतेसाठी डॉ प्राजक्ता लांजेवार
औषध निर्माण अधिकारी प्रियंका संगमवार, समुदाय आरोग्य अधिकारी निखील रंगारी, LSO मयुरी मॅडम, श्री STS बर्डे , आरोग्य सेवक श्री खाडे,श्री धात्रक, आरोग्य सेविका तोडासे सिस्टर, नियमीत क्षेत्र कर्मचारी श्री तरटे, इंगळे आणि आशा पर्यवेक्षिका, वाहन चालक रामेश्वर शेळके, आरोग्य कर्मचारी यांनी अथट परिश्रम केले.