कर्मवीर मारोतराव (दादासाहेब) कन्नमवार साहेब यांना विसरली सरकार.
★ चंद्रपूर,राजुरा,मूल,बल्लारशा, गडचिरोली,अहेरी भागातील दादासाहेब प्रेमी करणार मतदानाचा बहिष्कार.
एस.के.24 तास
राजुरा : कर्मवीर मारोतराव (दादासाहेब) कन्नमवार महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री विकासाच्या कामाचे अपार धनी,आयुध कंपनी,ताडोबा राष्ट्रीय उद्यान,अनेक नदीवरचे पूल, आरोग्य विभाग,बांधकाम विभाग, उपमुख्यमंत्री, मध्यप्रदेश मध्ये 1950 मध्ये राज्यसभा खासदार, ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा मोठा प्रवास,आदिवासी,विमुक्त भटक्या जमाती,चे नेतृत्व,ओबीसी प्रवर्गाचे पहिले मुख्यमंत्री,स्वातंत्र सैनांनी आणि मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचे निधन झाले.
तेव्हा पासून आता पर्यंत हजारो निवेदन साहेबाची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर व्हावी यासाठी पत्रव्यवहार केला गेला.मात्र आज पर्यंत त्यांची दखल कोणत्याच नेत्यांनी घेतली नाही. आता समोर १२५ वी जयंती आहे.
परंतु सरकार किंवा त्यांच्या मूल येथून निवडून आलेले माननीय मंत्री सुधीरभाऊ व राजुरा येथुन निवडून आलेले सुभाष भाऊ यांनी कर्मवीर कन्नमवार साहेब यांची जयंती शासकीय व्हावी यासाठी कॅबिनेट मध्ये साधा प्रस्ताव सुद्धा आणला नाही.
मुख्यमंत्री पदावर असताना निधन झालेले चंद्रपूर जिल्ह्यातील स्वतंत्र सेनानी मा.दादासाहेब यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्याचे लेखी आश्वासन देणाऱ्या पक्षालाच आमचे मत.