राज्यात येत्या २० नोव्हेंबर २४ ला होणा-या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सीमा सुरक्षा दल व पोलीस दल यांचा संयुक्त (रूट मार्च)पथ संंचालन.

राज्यात येत्या २० नोव्हेंबर २४ ला होणा-या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सीमा सुरक्षा दल व पोलीस दल यांचा संयुक्त (रूट मार्च)पथ संंचालन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रम्हपुरी : दिनांक,०४/११/२४ महाराष्ट्र राज्यामध्ये आगामी २० नोव्हेंबर २४ ला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच जनतेमध्ये पोलिसांविषयी आदरभाव व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता भारतीय सीमा सुरक्षा दल तसेच पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी, पोलीस स्टेशन नागभीड,पोलीस स्टेशन सिंदेवाही 

पोलीस स्टेशन तळोधी बाळापूर येथील अधिकारी व अंमलदार यांचे सह आज दिनांक ०४/११/२४ ला पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी वरून मौजा अ-हेर नवरगाव येथे रवाना होऊन तेथील बस स्टँड चौक पासून रूट मार्चला सुरुवात केली ,बस स्टँड चौका पासून बाजार चौक,बाजार चौक ते दुर्गामाता चौक, 


दुर्गा माता चौक ते हनुमान मंदिर, हनुमान मंदिर ते तलाव देवस्थान चौक व शेवटी प्राथमिक आरोग्य केंद्र, नवरगाव येथे रोड मार्च संपवून पुढे एक किलोमीटर असलेल्या पिंपळगाव (भोसले) गावामध्ये जाऊन ,तेथे रूट मार्चला सुरुवात केली.प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव भोसले येथून ग्रामपंचायत चौक, जेठुजी महाराज पुतळा चौक ,शिवाजी महाराज पुतळा चौक, भोई समाज चौका पर्यंत जाऊन पिंपळगाव ( भोसले) येथे रूटमार्च संपविला.


त्या नंतर सरकारी वाहनाने ब्रह्मपुरी येथे येऊन ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन पासून रूट मार्च ला सुरुवात केली, पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी वरून सराफा लाईन चौक, सराफा लाईन वरून ,विठ्ठल रुक्मिणी मंदिर ,तेथून सावरकर चौक, फवारा चौक, शिवाजी महाराज चौक , ख्रिस्त आनंद चौक, झाशी राणी चौक, संत रविदास महाराज, चौक रेणुका माता चौक, आणि हमपिया मस्जिद चौक, भवानी माता मंदिर चौक, वरून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे रूट मार्च समाप्त केला.


रूट मार्च मध्ये बीएसएफ चे तीन अधिकारी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी, नागभीड व शिंदेवाही येथील एकूण ९ अधिकारी व ३० पोलीस अंमलदार हे रूटमार्चला हजर होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !