वंदना बरडे अधिसेविका उपजिल्हा रूग्णालय वरोरा यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह साजरा.
एस.के.24 तास
वरोरा : दिनांक १५ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते.या वर्षाची थीम आहे.सुरक्षा, गुणवत्ता आणि पोषण काळजी -प्रत्येक नवजात बालकाचा जन्म हक्क आहे.या सप्ताहामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
१) १५ नोव्हेंबर २०२४ ला कांगारू मदर केअर KMC या विषयावर पूनम केवट अधिपरिचारिका
२)१६ नोव्हेंबर २०२४ संक्रमण नियंत्रण - कार्ड केअर (नाळेची काळजी) व हात धुण्याचे महत्व मिना मोगरे अप
३) १७ नोव्हेंबर २०२४ नवजात बाळातील उच्च जोखमीचे लक्षण नंदा सानप अप
४) १८ नोव्हेंबर २०२४ स्तनपानाचे महत्त्व वैष्णवी भोंडवे अप.
५) १९ नोव्हेंबर २०२४ ला स्तनातून दुध काढण्याच्या पद्धती व हात धुण्याचे महत्व प्रणाली गाथे अप.
६) २० नोव्हेंबर २०२४ ला लसिकरण आणि कुटुंबाची भुमिका स्नेहा रामटेके ए.एन.एम.शिष्टर
७) २१ नोव्हेंबर २०२४ ला सप्तहातील सर्व विषयांचा आढावा वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी घेतला.
डिलेवरी माॅडेल वापरून डिलेवरी कशी होते याविषयी मार्गदर्शन केले तसेच लसीकरण तक्ता, कुटुंब नियोजन,कचरा नियोजन आहार विहार चांगला ठेवण्यासाठी सांगितले तसेच आहार हा रुतुमानानुसार सकस व संतुलित असावा.आणि वरील सर्व विषयांवर मार्गदर्शन केले.तसेच हिवाळ्याचे दिवस आहे.
तर बाळाची कशी काळजी घ्यावी हे सांगितले व यासाठी सि.सि.पि.साधने जसे बेस्ट माॅडेल फ्लीपचार्ट,डाॅल माॅडेल,यांचा वापर करून पालकांना प्रभावी मार्गदर्शन केले.ईमरजीअन्शी १०८ या नंबरवर फोन करण्यास सांगितले.टोल फ्री नंबर 18008893669 या नंबरवर संपर्क साधावा त्यावर सर्व माहिती होईल.
कार्यक्रमासाठी वंदना विनोद बरडे अधीसेवीका, गीतांजली ढोक आहारतज्ञ, इंदिरा कोडापे परीसेवीका,पूनम केवट, मिना मोगरे, नंदा सानप यांनी मेहनत घेतली.वंदना पुंड आशा वर्कर निता चौधरी आशा वर्कर यांनी माहीती दिली.आणि नवजात शिशू सप्ताह साजरा करण्यात आला.