काका ने केला सख्ख्या गतीमंद पुतणीवर अत्याचार.


काका ने केला सख्ख्या गतीमंद पुतणीवर अत्याचार.

 

एस.के.24 तास


कोरची : वासनेच्या धुंदीत एका 50 वर्षीय इसमाने आपल्याच घरात सख्ख्या पुतणीवर लैंगिक अत्याचार केले.ती पीडित युवती 17 वर्ष 9 महिने वयाची आहे. विशेष म्हणजे ती अपंग आणि गतीमंत आहे. तिच्या असहायतेचा गैरफायदा घेणाऱ्या त्या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून वैद्यकीय तपासणीसाठी पीडित मुलीला गडचिरोलीला पाठवण्यात आले आहे.

नात्याच्या पावित्र्याला नासवणारी ही संतापजनक घटना कोरची तालुक्यातील बेडगाव पोलीस मदत केंद्राअंतर्गत एका गावात (गावाचे नाव मुद्दाम नमूद करत नाही) घडली. या प्रकरणातील आरोपी पीडित मुलीचे मोठे वडील आहेत.

आरोपी इसमाला दोन मुली असून त्या विवाहित आहेत. सदर आरोपी शेतीसह अधूनमधून परराज्यात जाऊन मजुरीची कामे करतो. त्याच्या लहान भावाचे कुटुंबही एकाच घरात सोबत राहते. घटनेच्या दिवशी आरोपीचा लहान भाऊ व त्याची पत्नी शेतावर कामावर गेले होते. घरात लहान भावाची अपंग आणि गतीमंद मुलगीच होती. ही संधी पाहून त्या आरोपीतील वासनांध सैतान जागा झाला. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे सुरू केले.

तिचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना त्या पीडित मुलीने आपल्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण तिने सांगितलेला प्रकार विश्वास ठेवण्यासारखा नसल्यामुळे मुलीच्या आईने खातरतजमा करत पोलिसात तक्रार केली. कोरची पोलिसांनी पोस्को व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करत पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी गडचिरोलीला पाठवले. त्यामुळे वैद्यकीय अहवालानुसार गुन्ह्यातील कलमांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कुरखेडा न्यायालयात आरोपीला हजर केल्यानंतर त्याला पीसीआर देण्यात आला. अधिक तपास कोरची ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवाजी ढाकरे करीत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !