बुध्दीवंतांनी संविधानाचे मूल्य तळागाळापर्यंत पोहचावे संविधान अमृत महोत्सव. - संजय मगरांचे प्रतिपादन
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : २६/११/२४ " आपल्या संविधानापासून जगातील काही देशांनी प्रेरणा घेऊन ते देश आज विकसित झाले आहेत पण आपला भारत अजूनही मागे आहे.संविधानाच्या शिल्पकाराला हे अपेक्षित नव्हते.या देशात लोकशाही रुजविण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. सामाजिक लोकशाही आपण अंगीकारुन समान संधी,समान न्याय समाजाला आपण समजावून सांगीतली पाहिजे.
बुध्दीवंतांनी संविधानाची मूल्ये तळागाळापर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत पोहचविले पाहिजे."असे मार्मिक भाष्य सामाजिक कार्यकर्ते संजय मगर यांनी केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात संविधान अमृत महोत्सवानिमित्त मार्गदर्शन करीत होते. सकाळी ११.००वा.प्राचार्य. डॉ.डी.एच गहाणेंच्या मार्गदर्शनाखाली संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन केल्या गेले.
व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर व प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ डी एच गहाणे, राजेंद्र डांगे,आयोजक डॉ.वर्षा चंदनशिवे, सहआयोजक डॉ प्रकाश वट्टी विचारपिठावर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ.शेकोकरांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक डॉ वर्षा चंदनशिवे,संचालन डॉ.प्रकाश वट्टी तर आभार डॉ.पद्माकर वानखडेंनी केले.कार्यक्रमाला समस्त प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.