सिध्दार्थ पथाडे यांचा रिपाई (आठवले) पक्षाच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा.
एस.के.24 तास
राजुरा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे यांनी पक्षाच्या लोकसभा, विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्या पदाधिकाऱ्यांसह विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये सांगितली. यामुळे रिपाई (आठवले) पक्षाला मोठा हादरा बसला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षानी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार न दिल्यामुळे समाजातील दलित, शोषित, वंचित घटक यांना न्याय देता येत नाही. समाजातील सामान्य नागरिकांना, पिढीतांना, शोशितांना न्याय देण्याकरीता लोकसभा व विधानसभेत जाऊन त्याचे प्रश्न सोडवावेत ही संकल्पना बाबासाहेबांची होती. परंतु रिपाई आठवले यांनी लोकसभा व विधानसभेत एकही जागा मिळवु शकलेले नाही व महायुतीकडुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोणताही मान सन्मान मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. त्यामुळे पक्षात काम करणे कठिण झाले असल्याने विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यांनी पक्षाचे राजीनामे वरिष्ठांकडे पाठविले आहे.
पथाडे यांनी यापूर्वी विदयार्थी दशेतच महाविदयालय निवडणुक लढली त्यानंतर राजकीय क्षेत्रातील प्रा. जोगेंद्र कवाडे, रामदासजी आठवले यांच्या संयुक्त रिपाई पक्षात काम केले. त्यांनी नगरपरिषद व विधानसभा निवडणुक लढविली. गेल्या ३० वर्षांपासुन रामदास आठवले याच्या गटाटाचे चंद्रपुर जिल्हा महासचिव ते विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष पद सांभाळले आहे. पक्षाला न्याय देण्याकरीता चंद्रपुर जिल्हयात पक्षाचे संघटन उभे केल्याचे सांगितले
यानंतरची भूमिका कार्यकर्त्याच्या विचार विनिमायाने घेणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी सिद्धार्थ पथाडे, तालुकाध्यक्ष ईश्वर देवगडे, माजी नगराध्यक्ष गीताताई पथाडे, रामदास दुर्योधन, चंदाताई वननकर, तालुका महासचिव प्रदीप उपरे, उपाध्यक्ष चरणदास मडावी, शहर अध्यक्ष महेंद्र साखरकर, विलास हजारे, महादेव पिपरे, सुदर्शन उपरे, सिद्धार्थ गणवीर, डॉ . विश्वास, प्रभाकर दुर्योधन, मारोती रामटेके सह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.