जन शिक्षण संस्थान,गडचिरोली बिरसा मुंडा जयंती व गुरु नानक जयंती साजरी.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोज शुक्रवार ला जन शिक्षण संस्थान,गडचिरोली कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय, भारत सरकार पुरुस्कृत यांच्या सभागृहात बिरसा मुंडा जयंती व गुरु नानक यांची जयंती साजरी करण्यात आली.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.केशव आर.चव्हाण संचालक जन शिक्षण संस्थान गडचिरोली हे होते.तसेच यावेळी कार्यालयीन कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा व गुरु नानक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व द्विप्रज्वल करून करसण्यात आली.
यावेळी मा.संचालक यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्याविषयी मार्गदर्शन केले.
जन नायक बिरसा मुंडा यांनी 19 व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांनी कुटील धोरण स्वीकारून आदिवासींना त्यांच्या जल,जंगल,जमीन आणि त्यांच्या नैसर्गिक साधनसंपत्तीतून बेदखल करण्यास सुरुवात केली.आदिवासी बंड करत असत,पण संख्यात्मक कमी आणि आधुनिक शस्त्रास्त्रे न मिळाल्याने त्यांचे बंड काही दिवसातच दडपले गेले.
हे सर्व पाहून बिरसा मुंडा अस्वस्थ झाले आणि शेवटी १८९५ मध्ये ब्रिटिशांनी लादलेली जमीनदारी आणि महसूल व्यवस्थेविरुद्धच्या लढाईबरोबरच त्यांनी जंगल-जमीन युद्ध सुरू केले. हे केवळ बंड नव्हते. आदिवासी अस्मिता,स्वायत्तता आणि संस्कृती वाचवण्यासाठी हा संघर्ष होता.
आधीच्या सर्व बंडातून शिकून बिरसा मुंडा यांनी प्रथम सर्व आदिवासींना संघटित केले आणि नंतर ब्रिटिशांविरुद्ध 'उलगुलान' हे महान बंड सुरू केले. ते म्हणाले. अशा महान क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंती व गौरव दिनाच्या बाबत उपस्तितांना शुभेच्छा दिल्या.मा.श्री. केशव चव्हाण संचालक यांनी उपस्तितांचे आभार मानले.