राजुरा वन विभागाची कारवाई ; रेती भरलेला ट्रॅक्टर पकडला.
एस.के.24 तास
राजुरा : मध्य चांदा वन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या राजुरा वन परिक्षेत्रातील राजुरा उपवन परिक्षेत्र मध्ये येणाऱ्या सुमठणा राखीव वनखंड क्रमांक १५४ मधील नाल्यातून रेती उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच वन विभागाने रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त करून कारवाई केली आहे.
राजुरा नियातशेत्र सुमठाना राखीव वनखंडात रेतीचा उपसा करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळताच वन विभागाने सापळा रचून रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४- सीडी २२०३ ताब्यात घेतला.या कारवाईत ट्रॅक्टर मालक अविनाश टाँगे व इतर तिघा विरोधात वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपवनाधिकरी जोंग यांच्या मार्गर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवड, शेत्र सहाय्यक एस एम संगमवार,एस आय तोडासे वनरक्षक पी ए मांदुळवर,एस व्ही गाजलवर,देशमुख यांनी कारवाई केली.