मारिया महाविद्यालय,मुल येथे संविधान दिनाचे आयोजन.
एस.के.24 तास
मुल : संविधान दिनाचे औचित्य साधून मारिया महाविद्यालय, मुल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.भास्कर सुकारे आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गीतांजली मशाखेत्रि प्रा. वैशाली साळवे, प्रा.कविता शेंडे लाभले होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले संविधान दिनाप्रसंगी डॉ.बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकून प्रा. मशाखेत्रि यांनी मार्गदर्शन केले.संविधान उद्देशिकेचे समस्त कर्मचारी वृंदांनी शपथ घेऊन वाचन केले.
26 -11 च्या हल्ल्यामध्ये वीरगती प्राप्त करणाऱ्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आणि राष्ट्रगीताने संविधान दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन प्रा.रोशन तिवाडे यांनी तर आभार प्रा.उमेश यातकरलेवर यांनी केले. विशेष सहकार्य रमेश मडावी आणि प्रियंका यांचे लाभले.