काँग्रेसला खिंडार ही भाजपने दिलेली बातमी चुकीची व जनतेची दिशाभुल करणारी. - रविंद्र चौधरी सरपंच, ग्रा.पं.राजगड
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : आमची राजगड ग्राम पंचायत महाराष्ट्रात आदर्श ग्राम पंचायत आहे.आतापर्यंत अविरोध निवड होत आलेली आहे.आमचा काँग्रेस भाजपा किंवा इतर कोणत्याही पक्षाशी संबध नाही,आम्ही अपक्ष अविरोध निवडून आलो आहोत,अनावधाने समाजाच्या कामासाठी मी व सोबत माझे सहकारी आम्ही पालकमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांचेकडे भेटीसाठी गेलो.असता आमच्या गळ्यात दुपतट्टे टाकून स्वागत केले व भारतीय जनता पार्टीच्या प्रवेश पत्रावर सही घेतली.
मात्र आता आपली चूक लक्षात आल्यांचे राजगडचे सरपंच रविंद्र चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.राजगडचे उपसरपंच,जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते चंदू पाटील मारकवार यांचेसह ग्राम पंचायत राजगडचे सदस्य सचिन भांदक्कर,अमर वालदे,रेवता ठाकूर,रोषणा कल्सार,मनीषा हजारे,शुभांगी आलाम उपस्थित होते.
गेल्या दोन दिवसापूर्वी राजगडचे सरपंच,रविंद्र चौधरी यांनी चंद्रपूर येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते भाजपात प्रवेश घेतला होता.आपण सामाजीक मंदिराचे मागणीकरीता गावातील काही नागरीकांसोबत गेलो होतो मात्र तेथे आपला पक्ष प्रवेश घेतल्यांचे त्यांनी यावेळी सांगीतले.आपले सोबत कुणीही सदस्य यावेळी उपस्थित नव्हते तरी इतर सदस्य असल्याचेही सांगीतले.
आम्ही काँग्रेसचे सदस्य नाही,राजगड ग्राम पंचायतीत आम्ही सर्व अविरोध निर्वाचीत झालो आहोत. आपसात चर्चा करूनच आम्ही सर्व निर्णय घेत असतो. मात्र काँग्रेसला खिंडार पाडून राजगडच्या सरपंचाचा भाजपात प्रवेश अशा मथळ्याखालील बातमी देणे चुकीचे असून, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडून अशी अपेक्षा नव्हती असे मत उपसरपंच चंदू पाटील मारकवार यांनी व्यक्त केली.
आजपर्यंत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजगडच्या विकासाचे कोणतेही प्रस्ताव मंजूर केले नाही. चांदा ते बांदा योजनेमध्ये कोणताही निधी दिलेला नाही. आता राजगड ची आठवण कशी आली असा टोलाही चंदू पाटील मारकवार यांनी हाणला यासाठी आम्ही सर्व त्यांच्या या कृतीचा निषेध करतो असेही म्हणाले.