नान्होरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,३०/११/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र , नान्होरी येथे आरोग्य विभागातर्फे कुटुंब कल्याण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र नान्होरी या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील १४ महिला व १० पुरूष असे एकूण २४ लाभार्थ्यांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.या शिबिराचे आयोजन वैद्यकिय अधिकारी डॉ.मनाली फटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या शिबिरात डॉ.तुषार मंडल व डॉ.अमन पंडेल यांच्याद्वारे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिराला तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विलास दुधपचारे यांनी उपस्थिती दर्शविली आणि प्रोत्साहन दिले.
तसेच प्रा.आ.केंद्रातील वै.अ डॉ.आचल लोधे, सर्व सामुदायिक अधिकारी, आरोग्य सहाय्यिका , आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक , आरोग्य सेविका, आशा वर्कर व संपूर्ण कर्मचारी वर्ग यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले.