जन शिक्षण संस्थान,गडचिरोली द्वारा " शिवणकला " प्रशिक्षण केंद्र,पोर्ला येथे उदघाटन संपन्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोज शुक्रवार ला जन शिक्षण संस्थान,गडचिरोली कौसल्य विकास व उद्योजगता मंत्रालय, भारत सरकार पुरुस्कृत तथा श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था, गोंदिया मातृत्व संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने जन शिक्षण संस्थान, गडचिरोली द्वारा " शिवणकला " प्रशिक्षण केंद्र,पोर्ला येथे उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. केशव आर. चव्हाण संचालक जन शिक्षण संस्थान गडचिरोली* हे होते. कार्यक्रमाचे उदघाटक मा.श्रीमती मनिषा सजनपवार,पोर्ला व्यवस्थापन मंडळ सदस्य ह्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सह उदघाटक मा.श्री.केशव आर.चव्हाण संचालक,जन शिक्षण संस्थान, गडचिरोली* हे होते.तसेच श्रीमती यामिनी मातेरे फिल्ड सहाय्यक JSS गडचिरोली उपस्थित होत्या, शिवणकला प्रशिक्षक सौ. निकिता बांगरे., व सौन्दर्य प्रशिक्षक श्रीमती सीमा प्रतिश काळबांधे सदस्य, धनश्री काळबांधे प्रशिक्षक उपस्थित होत्या.
सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनश्री काळबांधे यांनी केले. मा. श्रीमती मनिषा सजनपवार जन शिक्षण संस्थान, व्यवस्थापन मंडळ सदस्य यांनी प्रशिक्षनार्थी यांना मार्गदर्शन केले.
मा. श्री. केशव आर. चव्हाण संचालक जन शिक्षण संस्थान, गडचिरोली यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रशिक्षनार्थी यांना मार्गदर्शन केले. "शिवणकला" प्रशिक्षण प्रशिक्षण ला नियमित येऊन किमान 80% उपस्थित राहावे. व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व आपले जीवनमान उंचावे व कुटुंबाला हातभार लावावा.
तसेच श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून हस्तशिल्प कारागीर कार्ड काढून देण्याबाबत माहिती देण्यात आली, प्रशिक्षनार्थी चे JLG व बचत गट तयार करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच जन शिक्षण संस्थान द्वारा चालणाऱ्या विविध कोर्स बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ANM व GNM कोर्स संदर्भात माहिती देऊन कागदपत्रे जमा करण्यात आले. आभार प्रदर्शन धनश्री काळबांधे यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वीतेकारिता सौ. निकिता बांगरे., सिमा काळबांधे, धनश्री काळबांधे, वा प्रशिक्षनार्थी यांनी परिश्रम घेतले.