सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भारतीय संविधान दिन साजरा.

सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भारतीय संविधान दिन साजरा.


एस.के.24 तास


सावली : दिनांक,२६ नोव्हें.२०२४ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २ वर्ष ११ महिने १८ दिवसात संविधान मसुदा समितीने घटनेचे प्रारुप घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सोपवले.भारतीयांना समानतेची वागणूक,समान अधिकार तसेच कर्तव्याची जाणीव करुन देणारे संविधान आजच्या दिवशी स्वीकारले गेले.


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून संविधानाची निर्मिती केली. त्यांच्या या कार्याचे कृतज्ञ स्मरण.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची व्यापकता,कल्पकता, कायदेतज्ज्ञ,राज्यशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व चौकस दूरदृष्टी राज्यघटनेमध्ये दिसून येते.


तळागाळातील लोकांचा विचार समोर ठेवून सर्वांना समान अधिकार व मूलभूत हक्क संविधानाने दिले,भारतीय संविधान हे जगातील सर्वोतम असे संविधान आहे,भारतीय संविधानाने भारतीय लोकशाही पद्धतीला जगात अधिक बलाढ्य असे स्वरूप दिले आहे.संविधानात लोकशाही, समता व सामाजिक न्याय या तत्त्वांना अग्रक्रम आहे.


या मूल्यांशी सुसंगत असे संस्थात्मक, सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणत समाजाच्या सर्वंकष उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील राहण्याचा निश्चय संविधान दिनानिमित्त सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून केला.या प्रसंगी महामानव भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,माजी सभापती प.स.सावली विजय कोरेवार,माजी सभापती प.स. कृष्णा राऊत,जेष्ठ पदाधिकारी प्रशांत राईंचवार,नगरसेवक प्रितम गेडाम,सचिन संगीडवार,नितेश रस्से,नगरसेविका सौ.साधना वाढई,सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती गेडाम,सौ.ज्योती शिंदे,सौ.प्रियंका रामटेके, सौ.पल्लवी ताटकोंडावार,तसेच युवा पदाधिकारी रोशन बोरकर,पंकज सुरमवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,कुणाल मालवनकर आदी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !