बालविवाह मुक्त भारत जनजागृती कार्यक्रम सपन्न.
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील नियोजन भवनात बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आला . या अभियानात गडचिरोली शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वर्ग ८ वी ते १२ वी पर्यंतचे मुल आणि मुली यांना सहभागी करून घेण्यात आले.
हा उपक्रम स्पर्श संस्था व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आला . प्रा डॉ.दिलीप बारसागडे यांनी बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन आयुषी सिंग मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी केले. या कार्यक्रमात वर्षा मनवर बालकल्याण सामाजिक न्याय विभाग भोजराज कान्हेकर श्री.संत गाडगे महाराज विद्यालय,गोपिचंद बावनकुळे सर ,नरेंद्र मोटघेरे तसेच गडचिरोली शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.