अखेर आलापल्ली - भामरागड राष्ट्रीय महामार्गावर भामरागड जवळील पर्लकोटा नदीवर बॉम्ब स्फोटके पेरुन ठेवलेल्या आरोपीस अटक.
एस.के.24 तास
भामरागड : गडचिरोली जिल्हा हा माओवादाने प्रभावीत जिल्हा असल्याने या ठिकाणी माओवादी हे विविध हिंसक कारवाया करुन सुरक्षा दलाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असतात. नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 च्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांना नुकसान पोहचविण्याचा उद्देशाने भामरागड आणि ताडगावला जोडणाया पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके पेरून ठेवली होती.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बिडीडीएस पथकाच्या सहाय्याने सदर स्फोटकांचा शोध घेऊन पुरुन ठेवलेली स्फोटके घटनास्थळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आले. त्यावरुन सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्रे व दारुगोळा लुटण्याचे अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे अप. क्र. 52/2024 कलम 109, 132, 126 (2), 190, 191 (2) (3), 61 (2) भान्यासं, सह कलम 5/28 भाहका, सह कलम 4,5 भास्फोका, सहकलम 37 (1) (2) मपोका, सहकलम 13, 16, 18, 20, 23, 38, 39 युएपीए अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर घटनेमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका इसमास काल दिनांक 24/11/2024 रोजी गडचिरोली पोलीस दलाने अटक केले आहे.
सदर गुन्ह्रातील आरोपींचा शोध घेणे कामी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तहेर यंत्रणा तीव्र करण्यात आली, त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री.अमर मोहिते यांना विश्सवनिय सुत्रांकडुन गोपनिय बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असलेला आरोपी नामे पांडु कोमटी मट्टामी वय,35 वर्षे, रा. पोयारकोटी,तह.भामरागड.जि.गडचिरोली हा भामरागड जंगल परिसरात फिरत होता.
दिनांक,24/11/2024 रोजी पोउपनि.संकेत नानोटी यांचे नेतृत्वात पोस्टे भामरागड पार्टी व सिआरपीएफचे जवान पोस्टे परिसरातंर्गत आरेवाडा रोडवर नाकाबंदी करीता रवाना झाले.नाकाबंदी दरम्यान त्यांना एक व्यक्ती संशयीतरित्या वावरत असतांना दिसून आल्याने, त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता.
आरोपी नामे,पांडु कोमटी मट्टामी,वय 35 वर्षे रा. पोयारकोटी,तह.भामरागड,जि.गडचिरोली असून दिनांक 16/11/2024 रोजी भामरागड जवळील पर्लकोटा नदीवरील पुलाजवळ 01 क्लेमोर व 02 स्फोटके लावुन सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्रे व दारुगोळा लुटण्याचे अनुषंगाने कट त्याचा होता.
पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. 52/2024 कलम 109, 132, 126 (2), 190, 191 (2) (3), 61 (2) भान्यासं, सह कलम 5/28 भाहका, सह कलम 4,5 भास्फोका,सहकलम 135 मपोका, सहकलम 13, 16, 18, 20, 23, 38, 39 युएपीए अॅक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरव्यानिशी निष्पन्न झाल्याने त्यास काल दिनांक 24/11/2024 रोजीचे 10:05 वा. सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.यतिश देशमुख,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.एम.रमेश,अपर पोलीस अधीक्षक,अहेरी श्री.श्रेणिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री.अमर मोहिते,पोस्टे भामरागड प्रभारी अधिकारी पोनि.दिपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. संकेत नानोटी यांच्या नेतृत्वात पोस्टे भामरागड पोलीस व सिआरपीएफच्या जवानांनी पार पाडली.