एका मंजूर पदावर दोन अधिकाऱ्यांना नियुक्ती चे आदेश.
★ नागपूर विभागातील आरोग्य अधिकारी चा प्रताप.
एस.के.24 तास
नागपूर : नागपूर विभागातील अतिदुर्गम आदिवासी बहुल असलेल्या दोन तालुक्यासाठी एक आरोग्य अधिकारी चे पद मंजूर असून सदर पदावर दुसऱ्या जिल्हातून उच्चशिक्षित मागासवर्गीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली होती.परंतु सदर पदावर प्रभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी मात्र प्रभार सोडण्यास मुळीच तयार नसल्याने शासनाकडून नियुक्त उच्चशिक्षित मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदरी मात्र उपेक्षाच उरली,आणि वरिष्ठ अधिकारीही जून्याला कार्यमुक्त,भारामुक्त करेना ?
या कारणातून कुठेतरी पाणी मुरतंय हे स्पष्ट झाले होते आणि नियमानुसार सदर पदाचा दावेदार असलेल्या वेक्तीने वरिष्ठांच्या कार्यालयात आपले चपला झिजविले त्यांना अनेक प्रकारे दबाव आणला गेला असला तरी त्यांच्या प्रयत्नाने त्यांना सदर पदावर रुजू होण्याकरिता लेखी आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांन कडून प्राप्त झाले.
इतूनच प्रकरणाला खरी सुरुवात झाली आणि सदर तालुक्यात एकच पद मंजूर असताना पूर्वीपासून प्रभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना भारमुक्त,कार्यमुक्त न करताच यांना रुजू चे आदेश काडून दोघांनाही सदर पदावर विराजमान केले.
आणि नंतर मात्र पात्र उचशिक्षित मागासवर्गीय अधिकाऱ्याला जिल्हाभर फिरवायला सुरुवात केली आणि अनेक ठिकाणी बदल्या केल्या.
सविस्तर वृत्त पुढील भागात...
सदर प्रकरणात पूर्वीच्या प्रभारी अधिकारी चा प्रभार काडून मागासवर्गीय उच्च शिक्षित अधिकाऱ्याला प्रभार न दिल्यास अनेक मागासवर्गीय संघटना मंत्रालया समोर आंदोलन करणार असल्याचे सूत्रांन कडून खात्रीलायक माहिती मिळाली आहे.