ब्रम्हपुरी मध्ये एक रंगारंग कार्यक्रम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२५/११/२४ ब्रम्हाकुमारीज ,ब्रम्हपुरी यांच्या वतीने दि.२७ नोव्हेंबर २४ रोज बुधवारला सायकाळी ५ ते ९-०० वाजेपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगण ब्रम्हपुरी येथे वैश्विक संस्कृती, प्रेम ,शांती, सद्भावना यांचा संदेश देण्याकरीता राणी इंद्रानी शर्मा बॉलीवूड सिंगर, मुंबई यांचा एक रंगारंग कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला आदरणीय संतोष दिदीजी अतिरिक्त मुख्य संचालिका ब्रम्हाकुमारीज माऊंट आबू, दयाल भाई उपाध्यक्ष कला व संस्कृती प्रभाग, माऊंट आबू, जयगोपाल लुथरा आंतरराष्ट्रीय, सिंगर चंदीगढ, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी समस्त जनतेनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक ब्रम्हाकुमारीज, ब्रम्हपुरी यांनी केले आहे..