आघाडीचा उमेदवार काँग्रेसचा की महाविकास आघाडीचा.
★ राजुरा विधानसभा क्षेत्राचे शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुखाचे वागणे संशयास्पद.
एस.के.24 तास
राजुरा : विधासभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून राजुरा विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार मात्र आपल्या जुन्या भूमिकेतच आनंदित असल्याचे चित्र आहे. मागील लोकसभा निवडणुकीपासून आघाडी धर्म पाडणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शून्य म्हणणाऱ्या नेत्याला ही निवडणूक जड जाईल असे चित्र क्षेत्रातील चारही तालुक्यात दिसत आहे.शिवसेनेच्या अस्तित्वाला नजर लावणाऱ्या आयात जिल्हा प्रमुखाला सुद्धा या गोष्टीची कदर नसल्याची भूमिका क्षेत्रातील शिवसैनिकांमध्ये आहे.
आज दि 03 नोव्हेंबर 2024 रोज रविवार ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हा प्रमुख बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली.राजूऱ्याचे विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाप्रमुख यांची भूमिका मात्र शिवसैनिकांना डावलनारी दिसत आहे अश्या प्रकारची मते या बैठकीत दिसून आली.
जिल्हा शिवसेनेचे प्रमुख आणि विद्यमान आमदारामध्ये आधीच सेटिंग झाली असेल तर आम्हाला फक्त समजउपयोगी कार्य करून पक्ष कार्यासाठी वापरून घेण्यासाठी पक्षात पदावर रुजू केले असेल तर आम्ही सर्व शिवसैनिक सक्षम असून येणाऱ्या निवडणुकीत यांची जागा दाखवून देऊ असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
आघाडीचे उमेदवार म्हणून पक्ष्यातील पदाधिकाऱ्यांना डावलून फक्त स्वतःचा स्वार्थ म्हणून विभागाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख माजी पधादिकाऱ्यांना समोर करून आपली रोटी शेकत असल्याचा आरोप बबनभाऊ उरकुडे यांनी केला.
परंतु शिवसेना हा एक विचार असून आम्ही स्थानिक पातळीवर केलेले कार्य आणि गावागावात पक्ष्याच्या माध्यमातून लढवलेल्या निवडनणुका या माध्यमातून कार्यकर्ते आमच्याशी जुडून असून स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या प्रमुखांना याची प्रचिती लवकर येईल अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
येणाऱ्या 3 - 4 दिवसात आपण आपली भूमिका स्पष्ट करू अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया सर्व पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्या.येणाऱ्या काळात काय काय राजकीय घडामोळी घडतील याकडे सर्वांचे लक्ष असून राजुरा विधानसभा क्षेत्रात यावेळेस नक्कीच बदल घडवणार असल्याची प्रतिक्रिया सामान्य शिवसैनिकांनी दिल्या.
याप्रसंगी तालुका संघटक बबलू कुशवाह,शिवसेनेचे तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, तालुका उपतालुका प्रमुख रमेश झाडे,युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, विभागाचे प्रमुख, शाखा प्रमुख क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते.