पॉवर लिफ्टींग स्पर्धेत पायल नागरे हिला सिल्व्हर मेडल.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२९/११/२४ पंजाब (मोहाली) येथे २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या ३१ व्या ऑल इंडियन राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेत ब्रम्हपुरी ची पायल नागरे हिने ६३ की. ग्र. गटात २६० वजन उचलून सिल्व्हर मेडल प्राप्त केले.तर सिंगल इव्हेंट मध्ये गोल्ड मेडलची कमाई केली आहे. मोहाली येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेत देशभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पायलच्या यशामुळे ब्रम्हपुरी शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर कोरले गेले आहे.
तिने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक अमोल आवळे तसेच आई वडिलांना दिले आहे त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी राष्ट्रीय पातळीवर खेळू शकली मी पुन्हा मेहनत करून देशाबाहेरील स्पर्धेत आपल्या आई वडिलांचे माझ्या ब्रम्हपुरी शहराचे नाव उज्वल करीन हे माझे स्वप्न आहे असे पायल नागरे हिने प्रतिनिधीशी बोलताना म्हंटले.तिला मिळालेल्या यशाला ब्रम्हपुरी नागरिकांकडून तसेच विविध स्तरातून तिचे अभिनंदन केल्या गेले.