कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय,भारत सरकार पुरस्कार जन शिक्षण संस्थान,गडचिरोली येथे संविधान दिन उपक्रम साजरा. ★ जन शिक्षण संस्थानचा द्वारा विविध ठिकाणी संविधान दिन साजरा.

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय,भारत सरकार पुरस्कार जन शिक्षण संस्थान,गडचिरोली येथे संविधान दिन उपक्रम साजरा. 


जन शिक्षण संस्थानचा  द्वारा विविध ठिकाणी संविधान दिन साजरा.


एस.के.24 तास


गडचिरोली : सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन अलोणे कार्यक्रम अधिकारी यांनी केले. 

त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगतांना संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला. यानंतर, १ वर्षानी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू करण्यात आली.२०१५ मध्ये भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस " संविधान दिन " म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता याबाबत मार्गदर्शन केले. 

 


मा.श्री.केशव आर.चव्हाण संचालक यांनी संविधान दिना निमित्य संविधान शपथ उपक्रम राबविण्यात आला.याप्रसंगी जन शिक्षण संस्थानचे संचालक मा.श्री.केशव आर.चव्हाण यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना संविधान शपथ दिली, तसेच संविधानातील तत्व समता,बंधुता, स्वातंत्र्य,न्याय याबद्दलही मार्गदर्शन केले.  


यावेळी मा.श्री. विनीत भाजीखाये यांनी संविधानाबात माहिती देतांना फ्रेंच क्रांती चे दाखला देत संविधानाचे महत्व पटवून सांगितले.श्रीमती मनिषा सजनपवार यांनी संविधान कविता वाचून उपस्थितांना मार्गदर्शन केले. 


मा.श्री.केशव आर.चव्हाण संचालक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणत विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत असले. 


त्यात दिलेली मुलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. २६ नोव्हेंबर संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे. कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या १४० कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. राज्यघटनेतच देशाची तत्त्वे आणि ती चालवण्याच्या पद्धती आहेत.


याप्रसंगी व्यासपीठावर,मा.श्री.केशव आर.चव्हाण संचालक, जन शिक्षण संस्थान,गडचिरोली अध्यक्ष,प्रमुख अतिथी उदघाटक मा.श्री.विनीत भाजीखाये व्यवस्थापक, इंडियन बँक, गडचिरोली.श्रीमती मनिषा सजनपवार व्यवस्थापक मंडळ सदस्य,प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.गजानन अलोणे सर कार्यक्रम अधिकारी जन शिक्षण संस्थान,गडचिरोली,श्री.दिवाकर मोहुर्ले, यामिनी मातेरे व प्रशिक्षनार्थी उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यश चव्हाण, दिवाकर मोहुर्ले, यामिनी मातेरे फिल्ड सहाय्यक विध्यार्थी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती यामिनी मातेरे यांनी केले. कार्यक्रम जन शिक्षण संस्थांनचे संचालक तथा सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.केशव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. 


जन शिक्षण संस्थान, गडचिरोली द्वारा सौन्दर्य प्रशिक्षण केंद्र, कोरची व सौन्दर्य प्रशिक्षण केंद्र, व शिवणकला प्रशिक्षण केंद्र धानोरा येथे देखील " संविधान दिन " साजरा करण्यात आला.यावेळी कोरची येथे गजभिये मॅडम,श्रीराम विद्यालय शिक्षिका,ममता सुखादेवे प्रशिक्षक,व प्रशिक्षनार्थी कोरची तसेच सौ.पिंकी भैसारे, वेणू मशाखेतरी प्रशिक्षक वा गावकरी धानोरा उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !