ने.हि.महाविद्यालयात क्रांतीसूर्य म.जोतीबा फुले पुण्यतिथी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२८/११/२४ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले पुण्यतिथी कार्यक्रम नुकताच पार पडला.पुण्यतिथी कार्यक्रम निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एच गहाणे,उपप्राचार्य डॉ सुभाष यांनी सर्वप्रथम महात्मा फुलेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी ' क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले की जय,भारत माता की जय!' असा जयघोष करण्यात आला.
यानंतर प्रा.रमेश धोटे,डॉ राजेंद्र डांगे,डॉ.धनराज खानोरकर,डॉ.युवराज मेश्राम,डॉ किशोर नाकतोडे,डॉ.पद्माकर वानखडे, डॉ राजू आदे,प्रा रुपेश वाकोडीकर,
डॉ.कुलजित शर्मा,पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,प्रा अन्सारी,प्रा बोरकर,प्रा पराते,रुपेश चामलाटे, घनश्याम नागपूरे इत्यादींनी प्रतिमेला पुष्प वाहून आपली आदरांजली वाहिली.
यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ.कुलजित शर्मा, डॉ.खानोरकर,डॉ मेश्राम,प्रा धिरज आतला,प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.