पोटेगांव येथे संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न ; संविधान हे सर्वासाठी आहे त्याचा योग्य वापर करा. - देवाजी तोफा

पोटेगांव येथे संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न ; संविधान हे सर्वासाठी आहे त्याचा योग्य वापर करा. - देवाजी तोफा 


एस.के.24 तास


गडचिरोली : डॉ.बाबासाहेबांनी देशाला बहाल केलेले संविधान हे सर्वसाठीआहे त्याचा योग्य वापरा करावा आपण संविधानाचे संरक्षण कराल तर संविधान तुमचे संरक्षण करेल अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन आदिवासी सेवक,देवाजी तोफा यांनी पोटेगांव येथे  संविधान दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.

गडचिरोली तालुक्यातील पोटेगांव येथे संविधान दिनाचा कार्यक्रमाचे अध्यक्षआदिवासी सेवक देवाजी तोफा हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे भोजराज कानेकर,रिपाईचे नेते प्रा.मुनिश्वर बोरकर अँड. विनय बांबोळे,अँड.उमेश मडावी,रिपाईचे  नेते गोपाल रायपूरे,कोमल रामटेके चंद्रपूर,आदिवासी नेते शिवाजी नरोटे,विनोद मडावी,वंचितचे प्रशांत देव्हारे,प्रमोद राऊत  सरपंच मनोहर पोटावी,सनकु पोटावी,गणेश मड्डामी , संतोष वड्डे,दिलीप गोवर्धन,दिवाकर फुलझेले आदि मान्यवर उपस्थित होते. 



याप्रसंगी कानेकर सर म्हणाले की,७५ वर्षाच्या काळात अजुनही भारतीय संविधानाविषयी समाजामधे अज्ञान आहे ज्या दिवशी सर्व सामान्य जनतेला संविधानाविषयी जागृती निर्माण होईल त्या दिवशी सर्व सामान्य जनतेला हक्क आणि अधिकार मिळवण्यास संघर्ष करण्याची वेळच येणार नाही.


अँड.विनय बांबोळे म्हणाले की आपण सर्व संघटीत राहीलो तर सांविधान बदल करण्याची कोणाची हिम्मतच होणार नाही.

याप्रसंगी अँड.उमेश मडावी,प्रा. मुनींश्वर बोरकर,गोपाल रायपुरे,प्रमोद राऊत,प्रशांत देव्हारे,विनोद मडावी आदिची संविधान प्रती मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी नरोटे संचालन,ज्ञानेश्वर मुजुमकर तर आभार मनोहर पाटावी यांनी मानले.कार्यक्रमास पोटेगांव सर्कल चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !