मध्य चांदा वनविभागाचे चिवंडा वनपरिक्षेत्रात कक्ष क्र.१३८ मध्ये आठ महिन्यांच्या वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ.
एस.के.24 तास
चंद्रपूर : मध्यचांदा वनविभागाचे चिवंडा वनपरिक्षेत्रात कक्ष क्र.१३८ मध्ये वाघाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत वाघ मादी असून तिचे वय सात ते आठ महिने असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
वाघिणीच्या शरीरावर ओरखडल्याचे निशाण आढळले आहेत. मृतक वाघिणीचे सर्व अवयव शाबूत आहेत. प्रौढ नर वाघाचे लढाईत या सात ते आठ महिन्यांच्या मादीला मारल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.