रिपाईचे जेष्ठ नेते सुंदरदास उंदिरवाडे आष्टी यांना वैनगंगा नदी घाटावर बहुसंख्य बौद्ध बांधवाच्या उपस्थितीत श्रद्धाजली वाहली.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील रहिवासी रिपब्लिकन पार्टी चे जेष्ठ नेते महामहिम राज्यपाल मृतीशेष रा.सु गवई यांचे खंदे समर्थक सुंदरदास उंदिरवाडे ८० हे आज दि. 3 नोहेंबर २०२४ सकाळी ९ वाजता निधन झाले. आष्टी येथील त्यांच्या राहते घरातुन आज दि. 3 नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता अत्यंयात्रा निघुन ती वैनगंगा नदीघाटावर बहुसंख्य बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सुंदरदास उंदिरवाडे हे आर पि आय चे खंदे समर्थक होते त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात रिपब्लिकन पार्टी चे कार्य करून रिपब्लिकन पक्ष चामोर्शी तालुक्याच्या गावा गावात वाढविला समाजासाठी झटले आष्टी येथील चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा उभारण्यात त्यांचा शिहाचा वाटा आहे. अश्या समाजसेवकांच्या पश्चात पत्नी , मुलगा , सुन व नातवळ अशा गोतावळा आहे. समाजसेवक सुंदरदास उंदिरवाडे यांना श्रद्धांजली वाहतांना जिल्हा परिषद चे माजी सदस्य तथा रिपाईचे नेते अँड. राम मेश्राम
रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , शेड्युल्ड कॉस्टस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. विनय बांबोळे , डोर्लीकर मॅडम , अभारिप चे जिल्हाधक्ष हंसराज उंदिरवाडे , प्रभुदास खोब्रागडे , भाष्कर झाडे ' दिलीप बारसागडे , शशी दुर्गे , डॉ. गलबले , मारोती उराडे , अमित नगराळे , कवळू डोर्लीकर ' साव साहेब , प्रकाश डोर्लीकर , प्रकाश कुकडकर आदि सहित बहुसंख्य बौद्ध बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.