तरुणीवर प्रियकराने बलात्कार करुन तिचा खून करून मृतदेह फेकला ; आरोपी फरार.
एस.के.24 तास
उमरेड : उमरेडवमध्ये एक तरुणीवर प्रियकराने बलात्कार करुन तिचा खून केला.तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून या प्रकरणी उमरेड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला.
पूजा वर्ष 22 रा.उमरेड असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.लोकेश जुगनाके वय,30 वर्ष रा.अड्याळ असे आरोपी युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पूजा ही उमरेडमध्ये बीएसडब्ल्यू पदवीच्या द्वितीय वर्षाला शिकत होती.तिचे इंस्टाग्रामवरुन लोकेश जुगनाके या युवकाशी सूत जुळले. लोकेश हा मोठ मोठ्या हॉटेल मध्ये स्वयंपाकी (कूक) म्हणून काम करतो.दोघेही गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते.
या दरम्यान,त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या वेळोवेळी भेटी होत होत्या.पूजाला त्याने लग्नाचे आमिष दाखवले होते.नवीन वर्षात दोघेही लग्न करणार होते. त्यामुळे पूजा खूप खूश होती.
रविवारी लोकेशने तिला नेहमी प्रमाणे फिरायला जाण्यासाठी आग्रह केला.तिनेही होकार दिला.रविवारी सायंकाळी ते दोघेही एमआयडीसीकडे जाणाऱ्या महामार्गाने दुचाकीने फिरायला गेले होते.रात्र होताच पूजाने त्याला घरी सोडण्यास सांगितले.
लोकेश च्या मनात काहीतरी वेगळेच होते.त्याने महामार्गावरील एका बस स्टॉपवर नेले.तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला.त्यामुळे लोकेशने तिच्याशी बळबजरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
या प्रकारामुळे पूजाला संताप आला.दोघांचा वाद झाला. रागाच्या भरात लोकेशने पूजाचा ओढनीने गळा आवळून खून केला.तिचा मृतदेह बस स्टॉपमध्येच फेकून त्याने पळ काढला.सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी ठाणेदार धनाजी जळक यांनी हत्याकांड आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाला भेट दिली.फरार आरोपी लोकेशच्या शोधासाठी पथके तैनात करुन रवाना केले.
पूजाने शारीरिक संबंधास नकार देत घरी नेऊन मागितले होते.लोकेशने तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे ती दुःखी झाली.लोकेशने माझा रेप केला. त्याला शिक्षा झाली पाहिजे.
त्याने माझा विश्वासघात केला.मी प्रेम केले पण त्याने माझ्यावर फक्त शारीरिक संबंधासाठी प्रेम केले. पूजाने हातावर पेनाने लिहून ठेवले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.