आलापल्ली - भामरागड राष्ट्रीय महामार्गावर भामरागड जवळील पर्लकोटा नदीवर बॉम्बस्फोट.
★ नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणल्याचा तपास यंत्रणांना संशय ; सर्च ऑपरेशन सुरू.
एस.के.24 तास
भामरागड : नक्षल प्रभावित अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील तालुका भामरागड नजीक पर्लकोटा नदी जवळ नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे.तेथे स्फोट झाल्याची घटना आज दिनांक,16/11/2024 शनिवार ला सकाळी अंदाजे 9:00 वाजता उजेडात आली.
स्फोट झालेल्या 100 मीटर अंतरावर पोलीस कर्मचारी यांची कारनी रस्त्यावर थांबले असता बॉम्बस्फोट झाला.त्या स्फोटाच्या वायब्रेट झाल्याने कारची काच फुटले अशी माहिती प्रतिनिधी कडून माहिती मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी 4 दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे उद्या गृहमंत्री अमित शहा प्रचार सभेसाठी गडचिरोली येत आहेत.नक्षल्यांनी घातपाता च्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
आलापल्ली - भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. भामरागड जवळील पर्लकोटा नदीवर नवीन पूल बनत आहे.त्यासाठी तेथे काही मजूर काम करतात. या पुलाशेजारी रात्री मोठा आवाज झाला.सुदैवाने जीवितहानी टळली.
दरम्यान सकाळी पोलिसांनी तपासणी केली असता स्फोटाच्या ठिकाणी चुन्याने ओढलेल्या रेषा दिसून आल्या.या परिसरात सध्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू असता नक्षली अनेकदा जमिनीत स्फोटके पेरुन ठेवतात त्यानंतर स्फोट घडवून आणतात. या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा धोका नको म्हणून पोलिसांनी परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली व बॉम्बशोधक व पथकामार्फत तपासणी केली जात असतांना एक बॉम्ब ब्लास्ट झाला.आणि चार बॉम्ब निकामी करण्याकरिता काम सुरु आहे.
या मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तूर्त या मार्गावरील वाहतूक देखील रोखून धरली आहे. भामरागड हा छत्तीसगडला चिकटून असलेला परिसर आहे.गेल्या काही दिवसांत पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान प्रभावीपणे राबविल्याने नक्षल्यांची काहीशी पिछेहाट झाली आहे. विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर ला मतदान होत आहे.
त्याआधी स्फोट घडवून नक्षल्यांनी सुरक्षा यंत्रणेला आव्हान दिल्याचे पाहावयास मिळत आहे.
सर्च ऑपरेशन सुरू : -
नक्षल प्रभावित भामरागड जवळील पर्लकोटा नदीवरी नवीन पूल बनवला जात आहे. त्यासाठी तेथे काही मजूर काम करतात.या पुलाशेजारी स्फोट घडल्याची खात्री केली आहे. त्यात तथ्य आहे. या स्फोटाबद्दल अधिक चौकशी सुरू आहे. परिसरात शोधमोहीम सर्च ऑपरेशन सुरू आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.
पोलीस यंत्रणा सज्ज आहे,अशी माहिती गडचिरोली चे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.