गळफास घेऊन युवकाने केली आत्महत्या.
एस.के.24 तास
आरमोरी : तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वैरागड येथे मास्तर कॉलनी येथे गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक,13/11/ 2024 बुधवार ला सकाळी 8-30 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
मनीष ऊर्फ मुन्ना शंकर खोब्रागडे वय,38 वर्ष असे गळफास घेवून आत्महत्या केलेले युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वैरागड येथे मास्तर कॉलनीमध्ये मनीष खोब्रागडे आपल्या परिवारासमेत राहत होता.दिनांक,12 /11/2 2024 मंगळवारच्या रात्री जेवण करून तो आपल्या घरी झोपी गेला होता. 13/11 2024 ला कुटुंब सकाळी झोपेतून उठल्यानंतर खोलीमध्ये बघितले असता.तो झोपलेल्या रूममध्ये दिसला नाही.
म्हणून घरच्यांनी खालच्या मजल्याच्या वरती असलेल्या रूम कडे जाऊन बघितले असता त्यांना मनीष हा खोलीच्या आड्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसला. घरच्यांनी लगेच आरमोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे मृतकाचे शव पाठविले.
मनीष हा एकांतामध्ये राहत होता आणि त्याचे राज्यशास्त्रीय विषयांमध्ये M .A .पर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते आणि त्याला रोजगार नसल्याने नैराश्यपोटी टोकाचे पाऊल उचलले असावे अंदाज जनमानसाकडून वर्तवण्यात येत आहे.
मृतक मनीष यांच्या पश्चात तीन भाऊ आई वडील वहिनी दोन भाऊ सुना असा बराच मोठा आप्तपरिवार आहे .घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गवते यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दिलीप मोहुरले पोलीस हवालदार छंदक रामटेके पोलीस हवालदार वेस्कडे हे करीत आहेत.
परिवारातील सुशिक्षित कर्तबगार तरुण गळफास घेऊन मृत पावल्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.