काँग्रेस मधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायमच ; चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष गटागटांत विखुरला आहे.

काँग्रेस मधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायमच ; चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष गटागटांत विखुरला आहे.


एस.के.24 तास


चंद्रपूर : काँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायमच आहे.चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष गटागटांत विखुरला आहे.मोठ्या निवडणुकांमध्ये नेत्यांनी अंतर्गत गटबाजी विसरून एकदिलाने काम करावे.अशी पक्षश्रेष्ठींची भावना.या भावनेला दरवेळीप्रमाणे यंदाही सुरुंग लावण्याचे काम नेत्यांनी केले आहे. 


पक्षाचे ज्येष्ठ नेते एकमेकांच्या मतदारसंघांत प्रचारासाठी जाणे टाळत आहेत. नेत्यांमधील ही गटबाजी आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पसरली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सक्रिय प्रचारातून अंग काढून घेत आहेत.


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच्या ब्रम्हपुरी मतदारसंघासोबत डॉ.सतीश वारजुरकर,बल्लारपूर मध्ये संतोष रावत आणि चंद्रपूर मतदारसंघात प्रवीण पडवेकर यांच्यासाठी प्रचारसभा व बैठका घेतल्या.वरोरा व राजुरा मतदारसंघांत जाणे त्यांनी कटाक्षाने टाळले.


खासदार प्रतिभा धानोरकर वरोरा व राजुरा मतदारसंघांत सभा, बैठक घेत आहेत.चंद्रपुरात पडवेकर यांच्या एका बैठकीला त्यांनी हजेरी लावली.तसेच स्वतःच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. मात्र, येथे सक्रिय प्रचारापासून त्या दूरच आहेत.बल्लारपूर मतदारसंघात जाण्याचेही त्यांनी टाळले.


चंद्रपूर मतदारसंघात तर शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस,एन.एस.यू.आय.सेवादल या काँग्रेसच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय नसल्याचे चित्र आहे. अनेक पदाधिकारी त्यांच्या गटातील उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघांत जात आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे स्वतःच्याच प्रचारात अडकून पडले आहेत.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !