ब्रम्हपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील आकापूर या गावात ही सभा झाली. ★ गावाचा यापूर्वी वीज पुरवठा बरेच दिवस खंडित होता.मोबाईल टॉर्च मधल्या सभेत नेमका काय घडला ? वाचा सविस्तर वृत्त...

ब्रम्हपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील आकापूर या गावात ही सभा झाली.


गावाचा यापूर्वी वीज पुरवठा बरेच दिवस खंडित होता.मोबाईल टॉर्च मधल्या सभेत नेमका काय घडला ? वाचा सविस्तर वृत्त...


एस.के.24 तास


चंद्रपूर : राज्यातील सर्वात मोठे महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर जिल्ह्यात असूनही ग्रामीण भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असतो. अनेकदा दोन- तीन दिवस वीज नसते. अशाच तीन दिवसापासून वीज पुरवठा खंडित असलेल्या सावली तालुक्यातील आकापूर गावात कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या पित्याच्या प्रचारासाठी गेल्या.


तेथे त्यांनी मोबाईल टॉर्चमध्ये प्रचार सभा घेतली. प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी सभेत महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली.निवडून आल्यानंतर या सर्वांना दाखवते असा दम देखील दिला.


ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील आकापूर या गावात ही सभा झाली.या गावाचा यापूर्वी वीज पुरवठा बरेच दिवस खंडित होता.त्यानंतर तो सुरळीत झाला. मात्र आता तीन दिवसापासून वीज खंडित आहे. काही ना काही कारणांनी या गावात विजेचा लपंडाव सुरू असतो. शिवानी वडेट्टीवार गावात पोहचल्या त्यावेळी तेथे वीज नव्हती.


गावात सर्वत्र काळोख होता.त्यामुळे शिवानी हिने मोबाईलच्या टॉर्चमध्ये त्यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप तथा महायुती सरकारवर सडकून टीका केली. तसेच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरताना त्यांनी शिव्या हासाडल्या.


विकास गुजरातचा होत आहे, तुम्हचा गावाचा नाही. तुम्हचा जीवनात अंधार पेरण्याचे काम भाजप करीत आहे.उद्या विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना मोठ्या पदावर जाऊ द्या, मग या सर्वांना इंगा दाखवू.ते विरोधी पक्ष नेते आहेत. ते उद्याचे मुख्यमंत्री आहेत. 


त्यांना विजयी करण्याचे आवाहन शिवानी वडेट्टीवार हिने केले. त्यांची ही शिवराळ भाषा टीकेचा विषय ठरली आहे. यावेळी ग्रामस्थांनी देखील शिवानी वडेट्टीवार यांच्याकडे महावितरण कंपनीच्या विरोधात लेखी निवेदन व तक्रारी दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !