शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र बनले शेळी पालन केंद्र की पशू वैद्यकीय दवाखाना ?
★ प्रभारी डॉ.खाजगी क्लिनिक चालविण्यात व्यस्त - जिल्हा आरोग्य अधिकारी साखर झोपेत.
एस.के.24 तास
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या शेणगाव येथील आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात पथदिवे नादुरुस्त असल्यामुळे ऐन दिवाळीत प्राथमिक आरोग्य केंद्र अंधारात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित होऊन सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथील प्रभारी डॉ.सुखदेव करेवाड हे आपल्या खाजकी क्लिनिक मध्ये पेशंट बगण्यात व्यस्त आहेत.
मात्र सरकारी ईमारतीत शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडून दिल्याचे बगायला मिळत आहे,सदर डॉ.प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव इथे रुजू होण्याअगोदर पूर्वीच्या वैद्यकीय अधिकारी दवाखान्याच्या परिसरात अनेक वृक्ष लागवड केले होते.परंतु आता नवीन वृक्ष लागवड तर दूरच परंतु सदर वृक्षांनी देखभाल सुद्धा करण्यास दुर्लक्ष केले जात आहे.सध्या दवाखान्यात रुग्णांना येतांना प्रथम दर्शनी पशु वैद्यकीय दवाखाना आहे की काय असा चकित करणार प्रश्न रुग्णांना पडत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथील कार्यरत प्रभारी डॉ.सुखदेव करेवाड यांनी खाजगी क्लिनिक बंद करून शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत सेवा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
खाजगी क्लिनिक मध्ये मी ओपीडी च्या टाईम मध्ये नाही बसत.12 ते 4 मध्ये आणि इथली ओपीडी च्या टाईम च्या नंतर बसतो. - डॉ.सुखदेव करेवाड,प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र शेणगाव