सावली तालुक्यातील बोथली - हिरापूर मार्गावरील मार्कंडेय विद्यालयासमोर झालेल्या अपघातात 3 युवक ठार.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील बोथली- हिरापूर मार्गावरील वरील मार्कंडेय विद्यालयासमोर झालेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्रौ 9.30 वा.च्या सुमारास घडली.
हर्षद संदीप दंडावार वय,18 वर्ष रा.बोरचांदली ता.मुल जिल्हा.चंद्रपूर,साहिल नंदू गणेशकर वय,20 वर्ष रा.भंगराम तळोधी ता. गोंडपिपरी जिल्हा,चंद्रपूर,साहील अशोक कोसमशीले वय,21वर्ष रा.बोथली ता.सावली जिल्हा,चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.
शेतातून काम करून ट्रॅक्टर ही रोड च्या कडेला लावून एका सोबतीची वाट बघत असतांनाच केटीएम कंपनीची MH.34 CL 3229 या दुचाकी वर तिघे जण भरधाव वेगाने जात असतानाच दुचाकी स्वरांचा संतुलन सुटला आणि त्याने उभी असलेल्या ट्रॅक्टर MH.34 AP 1034 च्या मोठ्या चाकाला जबर धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की हर्षद दंडावार याचा जागीच मृत्यू झाला.तर साहील कोसमशीले बोथली व दुचाकी वर असलेला भांगराम तळोधी येथील त्यांचा मित्र साहिल गणेशकर गंभीर जखमी झाला.
त्या दोघांना गडचिरोलीच्या रुग्णालयात नेताना साहिल गणेशकर चा वाटेतच मृत्यू झाला.तर साहिल कोसनशिले या युवकाचा उपचारांअंती मृत्यू झाला. तीनही युवक हिरापूर येथे नाटक पाहण्यासाठी जात असल्याचे समजते.या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.