सातव्या वर्गात शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींकडून एका महिलेने देहव्यापार घरी सुरू होता.
★ गुन्हे शाखेने या अड्ड्यावर छापा घालून महिलेला अटक ; दोन्ही मुलींची सुटका.
एस.के.24 तास
नागपूर : सातव्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका महिलेने देहव्यापारात ढकलले. आंबटशौकीन ग्राहकांना बोलावून घरातच देहव्यापाराचा अड्डा सुरु केला. गुन्हे शाखेने या अड्ड्यावर छापा घालून महिलेला अटक केली तर दोन्ही मुलींना पोलिसांनी देहव्यापाराच्या दलदलीतून बाहेर काढले. या प्रकरणात आरोपी दलाल महिलेला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ७ हजार रुपये दंड ठोठावला. मुन्नीबाई असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे.
मुन्नीबाई ही ताजनगरमध्ये राहत असून देहव्यापारात सक्रिय होती. तिने १४ वर्षीय नात मिष्ठी आणि तिची वर्गमैत्रिण स्विटी (दोघींचेही बदलेले नाव) यांना देहव्यापाराच्या दलदलीत ओढले होते. सातव्या वर्गात शिकणाऱ्या दोघीही मुन्नीबाईच्या घरी अभ्यास करायच्या. मुन्नीबाईने सुरुवातीला दोघींनाही नवीन कपडे घेऊन दिले.
पहिल्यांदा स्विटीला ५०० रुपये देऊन एका आंबटशौकीन युवकाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. त्यानंतर मुन्नीबाई स्विटी आणि मिष्टी या दोघींसाठी ग्राहक शोधायची आणि त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायची. मुन्नीबाई ही नेहमी ५०० रुपये देत असल्यामुळे स्विटीसुद्धा झटपट पैसे कमविण्याच्या नादात मुन्नीबाईच्या जाळ्यात अडकली.
त्यामुळे मुन्नीबाई दररोज ग्राहक बोलावायला लागली. या प्रकाराची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या तत्कालिन पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून बनावट ग्राहक पाठवला आणि छापा टाकण्याची तयारी केली. बनावट ग्राहकाने मुन्नीबाईची भेट घेऊन ७ हजार रुपयांत सौदा केला. त्यानंतर पोलिसांनी छापा घातला.
या छाप्यात दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली तर मुन्नीबाईला अटक करण्यात आली. या प्रकरणात अजनीचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. अॅड. आसावरी परसोडकर यांनी या प्रकरणात सक्षमपणे बाजू मांडली. न्यायधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी मुन्नीबाईवर दोष सिद्ध झाल्याने २० वर्षे सश्रम कारावास आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
विवाहित मुलगी प्रियकरासोबत पळून गेली : -
मुन्नीबाईची विवाहित मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. त्यामुळे तिची मुलगी मिष्ठी मुन्नीबाईच्या घरी राहत होती. तसेच तिची वर्गमैत्रिण स्विटीची आईसुद्धा प्रियकरासोबत पळून गेली. त्यामुळे ती दारुड्या वडिलासोबत राहत होती. स्विटीचे वडिल बेरोजगार असल्यामुळे शाळेचे शुल्कसुद्धा भरत नव्हते. त्यात मुन्नीबाईने तिला दररोज ५०० रुपये पैसे देऊन जाळ्यात अडकवले होते. म्हणून दोन्ही मुली देहव्यापाराच्या दलदलीत अडकल्याची माहिती पोलिसांनी दिली.