संविधान दिन कार्यक्रम 26 ला पोटेगावात.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील पोटेगांव येथे दि. २६ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद च्या सदस्या कुंदाताई तोडकर तर उदघाटक एड.उमेश मडावी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर,शेड्युल कॉस्ट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.विनय बांबोळे , रिपाईचे नेते प्रा.मुनिश्वर बोरकर
रिपाई चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे, आदिवासी नेते शिवाजी नरोटे , बामसेफ चे प्रमोद राऊत , सरपंच्या अर्चना सुरपाम पोटेगांव , सामाजीक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुजुमकर आदि लाभणार आहेत . तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामसभा इलाखा व बौद्ध बांधव इलाखा पोटेगांव चे कार्यकारी मंडळाने केलेला आहे.