एस.के.24 तास न्युज चँनल चे सहसंपादक...
अमरदीप लोखंडे युवा आयकॉन महाराष्ट्र भूषण " समाज रत्न " पुरस्काराने सन्मानीत.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक !
ब्रम्हपुरी : दिनांक,25/11/2024 एस.के.24 तास न्युज चँनल चे सहसंपादक,ब्रम्हपुरी तालुक्यातील अहेरनवरगांव येथील रहिवासी कवी,सामाजिक, शैक्षणिक,वृक्षारोपण सारखे कार्य करून वृक्षांचे संगोपन करून मोठे करणारे अमरदीप लोखंडे यांचा पुणे येथील तळेगाव दाभाडे नाना - नानी पार्क सौ.पुष्पावती दशरथ बहुले सभागृह येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात युवा महाराष्ट्र भूषण आयकाॅन " समाज रत्न " पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.
उद्घाटक डॉ.अमरजी चौरे संस्थापक अध्यक्ष माय रमाई फाउंडेशन पुणे, प्रसिद्ध चित्रपट अभिनेता,टीव्ही सिरीयल न्यू होम मिनिस्टर अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर मुंबई, गौतमी पाटील लावण्यवती लावणी फेमस,अभिनेत्री आरोही हिवरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष,नितीन सूर्यवंशी डायरेक्टर ईशान्य ग्रुप कंपनी,मुंबई
प्रसिद्ध साहित्यिक देविदास रौराळे अमरावती,प्रमुख मार्गदर्शक शिवव्याख्याते हरीश भाऊ देखणे पुणे,बक्षीस वितरकत संजय कुलकर्णी तळेगाव दाभाडे,सागर भाऊ रितेश वाघमारे यांनी सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.
युवा आयकॉन महाराष्ट्र भूषण " समाज रत्न " पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून, मित्रपरिवार यांनी अमरदीप लोखंडे यांचे अभिनंदन,कौतुक व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.