चक्क चंद्रपूर शहरात पहाटे चक्क 200 रूपयांच्या नोटांचा पाऊस.
★ विश्वास जुना,धोका नवा " अशा...वाचा सविस्तर
एस.के.24 तास
चंद्रपूर : शहरातील सर्व मुख्य मार्ग, प्रमुख रस्ते,बगीच्या, वार्ड व प्रभागातील सर्व भागात पहाटेच्या सुमारास 200 रूपयांच्या नोटांचा अक्षरश: पाऊस पडला. जवळपास पाच ते सात करोड रूपयांच्या या नोटा ठिकठिकाणी आढळल्याने लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे सर्वत्र उत्सुकता आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र या लहान मुलांच्या खेळण्याच्या नोटा असल्याचे व त्याचे दुसरे बाजूला 200 युनिट तथा विश्वास जुना. धोका नवा असे लिहिले होते.शहरात या नोटांचा विषय सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या उत्साहात चंद्रपूर शहरात शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी लोकांना २०० रुपयांच्या नोटा अनेक ठिकाणी रस्त्यावर, बगीच्यात अस्ताव्यस्त पडलेल्या आढळल्या.त्यामुळे सर्वत्र उत्सुकता आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते.
अनेकांनी मागे वळून रस्त्यावर विखुरलेल्या 200 रुपयांच्या नोटा उचलल्या असता, नोटांची दुसरी बाजू पाहिल्यानंतर या नोटा डमी आणि लहान मुलांच्या खेळण्यांच्या नोटा असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या नोटा शहरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने विखुरल्या गेल्या होत्या की लोकांना त्या खऱ्या नोटा असल्याचे समजले, मात्र या नोटांची दुसरी बाजू पाहिल्यावर या नोटा प्रचारासाठी अवलंबण्यात आलेले डावपेच असल्याचे समोर आले.
विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असतांना भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांना या माध्यमातून लक्ष करण्यात आले आहे.शुक्रवार 15 नोव्हेंबर रोजी शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा असतांनाच्या पार्श्वभूमीवर जोरगेवार यांना लक्ष करणारी ही खेळी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
शहरात ठिकठिकाणी जप्त करण्यात आलेल्या या 200 रुपयांच्या डमी नोटांच्या मागील बाजूस " 200 युनिट मोफत देण्याचे आश्वासन " विश्वास जुना,धोका नवा " अशा घोषणा लिहिलेल्या आढळून आल्या.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील एका विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला टार्गेट करून मध्यरात्री शहरात सर्वत्र या नोटा कोणीतरी विखुरल्याचे अशा नोटा जप्तीवरून स्पष्ट झाले. शहरात सापडलेल्या नोटांच्या या प्रकारांमुळे एकीकडे जिल्ह्यातील राजकीय विभागात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे नोटांचा हा पाऊस सर्वसामान्य मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
शहरातील प्रत्येक नागरिक व मतदारांच्या हातात या नोटा दिसत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरच नाही तर झोपडपट्टी मध्येही या नोटा पहाटेच्या सुमारास मिळाल्या आहे.