लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना पूलावरुन कार नदीत कोसळून 2 महिलासह 3 ठार 3 जखमी.
एस.के.24 तास
सांगली : कोल्हापुरात लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना मोटारीवरील ताबा सुटल्याने अंकली पूलावरुन कृष्णा नदीत मोटार कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलासह तिघे ठार तर तिघे जखमी झाले. मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून अपघातग्रस्त सांगलीचे रहिवासी आहेत.
लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने मोटार थेट नदी पात्रात कोसळली या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला.मृतात दोन महिला आणि पुरुषाचा समावेश आहे.यातील मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत.
कोल्हापूर येथून एक लग्न सोहळा आटोपून हे कुटुंबीय सांगलीकडे येत होते.त्यांची मोटार जयसिंगपूर हुन सांगली कडे येत असताना अंकली पुलावर गाडीवरील ताबा सुटला आणि थेट नदी पात्रात कोसळली.
यामध्ये प्रसाद भलचांद्र खेडेकर वय,४०वर्ष,प्रेरणा प्रसाद खेडेकर वय,३५ वर्ष,वैष्णवी संतोष नार्वेकर वय,२३ वर्ष यांचा मृत्यू झाला तर साक्षी संतोष नार्वेकर वय,४२ वर्ष,वरद संतोष नार्वेकर वय,२१ वर्ष आणि समरजित प्रसाद खेडेकर वय,५ वर्ष हे जखमी झाले आहेत.