चिमुर मध्ये भाजप चे किर्तीकुमार भांगडिया 10 हजार 171 मतांनी विजयी. ★ क्रांतीभूमित मोदी जिंकले,गांधी हरले अशी चर्चा सुरू झाली आहे.

चिमुर मध्ये भाजप चे किर्तीकुमार भांगडिया 10 हजार 171 मतांनी विजयी.


क्रांतीभूमित मोदी जिंकले,गांधी हरले अशी चर्चा सुरू झाली आहे.


एस.के.24 तास


चिमुर : चिमूर क्रांतीभूमित पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॉंग्रेस खासदार राहुल गांधी या दोघांनी अनुक्रमे भाजप उमेदवार आमदार किर्तीकुमार भांगडीया व कॉग्रेस उमेदवार सतिश वारजूरकर यांच्यासाठी जाहीर सभा घेतल्या. येथे भाजपचे भांगडीया 10 हजार 171 मतांनी विजयी झाल्याने क्रांतीभूमित मोदी जिंकले,गांधी हरले अशी चर्चा सुरू झाली आहे.


चिमूर क्रांतीभूमी ही कॉग्रेसचा गड होती.2014 मध्ये सर्वप्रथम किर्तीकुमार उर्फ बंडी भांगडीया यांनी कॉग्रेसच्या या गडाला सुरूंग लावला.त्यानंतर भांगडीया 2019 व आता 2024 मध्येही विजयी झाले आहेत. भांगडीया यांना 1 लाख 15 हजार 863 मते मिळाली तर वारजूरकर यांना 1 लाख 5 हजार 692 मते मिळाली.भांगडीया 10 हजार 171 मतांनी विजयी झाले.


या क्रांतीभूमित भांगडीया यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर सभा घेतली होती. या सभेला लोकांनी गर्दीही केली होती.तर कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही या भूमित सभा झाली.लोकांनी मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवत भांगडीया यांना विजयी केले तर वारजूरकर यांना पराभूत केले. त्यामुळे आता क्रांतीभूमित मोदी जिंकले व गांधी हरले अशी चर्चा सुरू झाली आहे.


विशेष म्हणजे, क्रांतीभूमित सर्वाधिक 81.95 टक्के मतदान झाले.या वाढलेल्या मतदानाचा फायदा भांगडीया यांनाच झाला.ही सर्व मते क्रांतीभूमितील लाडक्या बहिणींची होती अशीही चर्चा आता सर्वत्र आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !