ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे घेतलेल्या गोडाऊन च्या झडतीत 1 लाख 5 हजारचा अवैद्य देशी दारूचा साठा जप्त.

ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे घेतलेल्या गोडाऊन च्या झडतीत 1 लाख 5 हजारचा अवैद्य देशी दारूचा साठा जप्त.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपूरी : दिनांक,०८/११/२४ पोलीस दूरक्षेत्र मेंडकी परिसरात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे हळदा येथे हरभजनसिंग टाक वय ३७ वर्ष यांच्या गोडाऊनची पंचा समक्ष झडती घेतली असता गोडाऊन मधील एका खोलीतील कोपऱ्यात 30 खर्ड्याच्या खोक्यात राकेट देशी दारू संत्रा कंपनीचे९०एम.एल. ३००० नग प्लास्टिक शिशी अंदाजे किंमत (रुपये - एक लाख पाच हजार)१,०५०००/- रुपयाचा अवैद्य माल मिळून आला.


त्यामुळे पोलीस स्टेशन, ब्रह्मपुरी यांनी अपराध क्रमांक ५३८/२०२४ कलम ६५ ई महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.


सदरची कारवाई माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले,यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे,नितेश डोर्लीकर,पोलीस हवालदार योगेश शिवणकर, नापोका मुकेश गजबे, संदेश देवगडे अजय कटाईत यांनी केली आहे..

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !