शारदा मंडळात FHI च्या वतीने जनजागृती डेंगू मलेरिया मोहीम.
चंदू बेझेलवार - भामरागड तालुका प्रतिनिधी
भामरागड : दिनांक 7/10/2024रोज सोमवार लां डासजण्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्प EMBED FHI गडचिरोली च्या वतीने भामरागड तालुका मन्नेराजाराम PHC अंतर्गत लंकलगुळा इथे शारदा माता मंडळात लोक कल्याणकारी संदेश व जनजागृती चे कार्य होत आहेत या नवरात्रीच्या पावन दिवसात प्रतेक्ष गावातील लोकांना दवंडी देऊन शारदा माता मंडळात बोलावून लोकांना गोळा करून व लोकांशी थेट संवाद साधून डेंग्यू मलेरिया विषयी तेलुगू गोंडी, माळीया भाषेत लोकांना मोडूल, स्पीकर, ब्यानर, पोस्टर, प्रत्यक्ष डेमो च्या मध्मातून चीत्रीकरणाद्वरे समजावून सांगण्यात आले.
एक दिवस कोरडा पाळण्यास सांगितले तर डेंग्यू मलेरिया आजाराची लक्षणे डोके दुखी उल्टी थंडीवाजून ताप येणे , ताप जाणे येणे, हातपाय दुखणे, मळमळ होणे असे काही लक्ष्णे दिसल्यास त्वरित आशाताई किंवा जवळच्या दवाखान्यात जाऊन रक्ताची तपासणी करून घ्यावी असे सांगण्यात आले.
आणि कोरडा दिवस पाळणे याबद्दल माहिती देण्यात आली तर कुणाला हा आजार झाल्यास त्याचा उपचार मधोमध किंवा अपूर्ण उपचार करू नये डॉक्टर नि दिलेला पूर्ण उपचार घ्यावा असे सांगितले जात आहे तर या कार्यक्रमात उपस्थित समस्त गावकरी तर सहभागी झालेले कर्मचारी गावचे पोलीस पाटील येजुलवार,CANM आरती धूर्वे
आशा पुष्पाताई,सरपंच, गावकरी मंडळी उपस्थीत होते. तर फ्यामिली हेल्थ इंडिया चे BCCF मा. रवींद्र दुर्गे यांनी ही जनजागृती ची मोहीम हाती घेऊन प्रत्येक मंडळात जाऊन हा उपक्रम राबवून डेंग्यू व मलेरिया आजाराचे समज गैरसमज दूर करून स्थानिक भाषेत लोकांना समजेल अशा पध्दतीने जनजागृती चे काम करीत आहेत.