गोंगपाने भरला उमेदवारी अर्ज. रिपाईचे सहकार्य मिळणार
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - गोंडवांना गणतंत्र पार्टी तर्फे आपला उमेदवार योगेश बाजीराव कुमरे यांनी गडचिरोली विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज भरला . योगेश बाजीराव कुमरे हे शस्कत उमेदवार असुन त्यांचा उमेदवारी अर्ज भरतांना गोंगपाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रशांत मडावी ,
शिवाजी नरोटे , नारायण सय्याम,राजु मडावी , विशाल सडमाके . किष्णा धानफोले,किशोर मातलामी 'संदिप हलामी ' क्रिष्णा उईके , किसन मडावी , साईनाथ कोडापे , मडावी महाराज,रोहीत तुमरेटी,सह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते. गोंडवाना गणतंत्र पार्टीला रिपब्लिकन चे विविध गटाचा पाठींबा राहणार असल्याचे कळते.